आज मला म्हणावस वाटतय……

cropped-2020485686

सुट्टी संपली, शाळा चालु झाल्याहोत्या,

पुस्तकाला जुन कव्हर घालताना मी माझा मोठ्या भावाला पाहिल,

दुसऱ्या दिवशी त्याचा छोटा भाऊ वहिला नवीन कव्हर घालून शाळेत जाणार,

या गोष्टीचा आनंद मी त्याचा डोळ्यात पहिलाय,

आज मला म्हणावस वाटतय काय झाल मी खेड्या मध्ये राहणारा असलो मला शिकायचय.

त्या कडकडत्या उन्हात मी माझ्या आई ला राबताना पाहिलंय,

वडलांच्या पायाला लागणारे त्या उन्हाचे चटके मी पाहिलेत,

काय झाल मी खेड्या मध्ये राहणारा असलो मला शिकायचय.

भुकेपोटी रडणाऱ्या बाळाला पाणी पाजून चूप करणाऱ्या आईच अंतकरण मी जानलय,

या उंच इमारतीच्या जंगलात मला सुद्धा माझ घरट बनवायचय,

काय झाल मी खेड्या मध्ये राहणारा असलो मला शिकायचय.

अनेक मार्गाने माझ्या आई-वडीलांची होणारी घुसमुठ मी पाहिली आहे,

त्यांच्या दोघांच्या डोळ्यांतले अश्रू दुष्काळा सारखे जिरतांना मी पहिलाय,

काय झाल मी खेड्या मध्ये राहणारा असलो मला शिकायचय.

लहानाचा मोठा करणाऱ्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहतांना मी पाहिलय,

त्या अशिक्षित आईच्या पोटी जन्माला आलेला EDUCATED मुलगा मला व्हायचय,

काय झाल मी खेड्या मध्ये राहणारा असलो मला शिकायचय.